Posts

Showing posts from January, 2021

The Life I Have Experienced , My Life & The Changes That Have Taken Place In It After My Parents Were Ordained

Image
 I am originally from Pune, my village Mahur which will not be seen as much in history but the history of Shivakalin period will be experienced or created. Because the history of our taluka belongs to Shri Chhatrapati Shivaji Maharaj , It is very famous during the time of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and that is the history of Purandar fort. I am a middle class young man from a middle class family. I was born on August 27, 1990 in Baramati. My parents used to tell me that even a small child looked very cute. Which you can understand by looking at my photos. Since I have a favorite sugarcane field in our house, molasses and sugarcane juice are my favorite daily food. The elder brother has been with my uncle(Mom's Brother) since he was a child.   He came in the season of pushing mangoes very hard. It was a planned event to throw mangoes with stones and why should I stop under the trees while cutting them so that no one else would run away and While doing so, i fell on the ground

मी अनुभवलेले बालपणं २

Image
                             तर अशीच ही दहशत प्रत्येक सुट्टीमध्ये अनुभवयास मिळायची काळांतराने फरक एवढाच झाला की दादा सुट्टीला येतोय समजलं की एक दोन चुलत भाऊ त्यांच्या मामांकडे सुट्टीला जाऊ लागले.                        जसे जसे मोठे होऊ लागलो तसे हे कारणामे कमी होऊ लागले , त्यात भर पडत गेली ती फिस्ट (पार्टी) करायचं मंग त्यात पोहे, खिचडी, वडापाव यातील बहुतेक मेनू करताना फसलेले तरीपण फिस्ट मात्र चालूच राहिल्या. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी माझ्या आजोळी बारामती मध्ये जाऊ लागलो. तिथे दादा म्हणजे माझे आजोबा रोज आम्हाला पाणीपुरी , रगडापुरी , मस्तानी खायला नित्यनेमाने न्यायचे. आजोबांनी खुप लाड पुरवले आम्हा सगळ्यांचे व्हिडिओ गेम्स , बॅट बॉल कॅरम अशी सारी खेळणी त्यांनीच आम्हाला घेऊन दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मामा पणं आमचे खुप लाड पुरवू लागले. पण घरामध्ये असं एक तरी व्यक्तीमत्व असावं ज्यांना लहान मुलं घाबरून जातील असे व्यक्तीमत्व म्हणजे माझे मामाश्री ते जेव्हा हा ब्लॉग वाचतिल तेव्हाच त्यांना या जुन्या आठवणी ताज्या होतील. त्यातलाच एक किस्सा (गोष्ट) म्हणजे आजोबांनी घेतलेली व्हिडिओ गेम सह

मी अनुभवलेले बालपणं १.

Image
 मी मुळचा पुण्यातलाच , माझं गावं माहुर जे ईतिहासात तसं जास्त नं दिसणार पणं शिवकालीन इतिहास जवळुन अनुभवलेल किंवा घडवलेल पण असु शकत. कारण आमच्या तालुक्यातील इतिहास हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खुप गाजलेला आहे आणि तो म्हणजे पुरंदर किल्ल्याचा इतिहास.             मी तसा मध्यम वर्गीय कुटुंबातील एक मध्यम वयाचा तरुण माझा जन्म २७ ऑगस्ट १९९० रोजी बारामती मध्ये झाला. लहान पणी  खूप गोंडस दिसतं होतो असे माझे आई/वडील मला नेहमीच सांगायचे. जे तुम्ही माझा फोटो बघुन समजु शकतात. मी घरातील बहुतेक सर्वांचाच आवडता आमच्या घरी ऊसाचं गुऱ्हाळ असल्यामुळे काकवी, ऊसाचा रस हे माझे आवडीचे रोजचे खाद्यपदार्थ. मोठाभाऊ लहाणपणापासूनच मामांकडे असल्यामुळे सुट्टीसाठी आला की घरामध्ये धिंगाणाच.                                   तो खुप खटपटी आंब्याच्या सिझन मध्ये आला की दगडाने आंबे पाडणे हा ठरलेला कार्यक्रम आणि ते पाडताना मला झाडाखाली थांबवणे का तर ते दुसऱ्या कोणी पळवू नये आणि असं करताना डोक्यात दगड लागून कोच पडणे साहजिकच मगं अशामुळे तो आला की माझ्या चुलत्या माझ्या चुलत भावांना आमच्या बरोबर पाठवायला घाबरायच्या एवढ