मी अनुभवलेले बालपणं २
तर अशीच ही दहशत प्रत्येक सुट्टीमध्ये अनुभवयास मिळायची काळांतराने फरक एवढाच झाला की दादा सुट्टीला येतोय समजलं की एक दोन चुलत भाऊ त्यांच्या मामांकडे सुट्टीला जाऊ लागले.
जसे जसे मोठे होऊ लागलो तसे हे कारणामे कमी होऊ लागले , त्यात भर पडत गेली ती फिस्ट (पार्टी) करायचं मंग त्यात पोहे, खिचडी, वडापाव यातील बहुतेक मेनू करताना फसलेले तरीपण फिस्ट मात्र चालूच राहिल्या. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी माझ्या आजोळी बारामती मध्ये जाऊ लागलो. तिथे दादा म्हणजे माझे आजोबा रोज आम्हाला पाणीपुरी , रगडापुरी , मस्तानी खायला नित्यनेमाने न्यायचे.
आजोबांनी खुप लाड पुरवले आम्हा सगळ्यांचे व्हिडिओ गेम्स , बॅट बॉल कॅरम अशी सारी खेळणी त्यांनीच आम्हाला घेऊन दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मामा पणं आमचे खुप लाड पुरवू लागले.
पण घरामध्ये असं एक तरी व्यक्तीमत्व असावं ज्यांना लहान मुलं घाबरून जातील असे व्यक्तीमत्व म्हणजे माझे मामाश्री ते जेव्हा हा ब्लॉग वाचतिल तेव्हाच त्यांना या जुन्या आठवणी ताज्या होतील. त्यातलाच एक किस्सा (गोष्ट) म्हणजे आजोबांनी घेतलेली व्हिडिओ गेम सहा ते सात महिने आम्ही आमच्या मामांना समजुनंच दिली नव्हती , ते कामानिमित्त बाहेरगावी असल्यावरच आम्ही ती खेळायचो. आणि ते येणारेत असं समजलं की लपवून ठेवलीच असं समजां.
असेच जवळ जवळ सहा ते सात वर्षे माझे बालपण खुप आनंदी , लाडामध्ये चाललेले. माझ्याकडे लहानपणी घेतलेल्या गेमचा फोटो नाहीये पण तुम्हाला समजण्यासाठी मी सेम तशाच व्हिडिओ गेम च्या सेटअप चा फोटो इथे जोडत आहे.
मस्त लिहिता असच लिहत रहा
ReplyDelete