मी अनुभवलेले बालपणं १.
मी मुळचा पुण्यातलाच , माझं गावं माहुर जे ईतिहासात तसं जास्त नं दिसणार पणं शिवकालीन इतिहास जवळुन अनुभवलेल किंवा घडवलेल पण असु शकत. कारण आमच्या तालुक्यातील इतिहास हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खुप गाजलेला आहे आणि तो म्हणजे पुरंदर किल्ल्याचा इतिहास.
मी तसा मध्यम वर्गीय कुटुंबातील एक मध्यम वयाचा तरुण माझा जन्म २७ ऑगस्ट १९९० रोजी बारामती मध्ये झाला. लहान पणी खूप गोंडस दिसतं होतो असे माझे आई/वडील मला नेहमीच सांगायचे. जे तुम्ही माझा फोटो बघुन समजु शकतात.
मी घरातील बहुतेक सर्वांचाच आवडता आमच्या घरी ऊसाचं गुऱ्हाळ असल्यामुळे काकवी, ऊसाचा रस हे माझे आवडीचे रोजचे खाद्यपदार्थ. मोठाभाऊ लहाणपणापासूनच मामांकडे असल्यामुळे सुट्टीसाठी आला की घरामध्ये धिंगाणाच.
तो खुप खटपटी आंब्याच्या सिझन मध्ये आला की दगडाने आंबे पाडणे हा ठरलेला कार्यक्रम आणि ते पाडताना मला झाडाखाली थांबवणे का तर ते दुसऱ्या कोणी पळवू नये आणि असं करताना डोक्यात दगड लागून कोच पडणे साहजिकच मगं अशामुळे तो आला की माझ्या चुलत्या माझ्या चुलत भावांना आमच्या बरोबर पाठवायला घाबरायच्या एवढी त्याची दहशत. असं माझं बालपण चाललं होतं.
छान.... लहानपण देगा देवा...😍😘🤗💞
ReplyDeleteखूप छान वाटल वाचून. मला माझे जुने दिवस आठवले
ReplyDeleteलहान पण देगा देवा
ReplyDelete